।। सावट ।।

कातळ जमिनीत,
या वर्षीही पेरले,
बुजगावणे शेतात
चहूकडे नेमले।।

हिरवागार शालू
धरणीने घातला,
पाखरांच्या थव्यांनी
आसमंत भरला।।

पण...
आकाशाने सावट
पावसाचे घातले
मातीतले पीक
शेतातच विरले

जबाबदारी ने तो
पुन्हा एकदा वाकला,
चालला, बसला, झुकला...
आणि प्राणास मुकला।।

- प्रशांत

Comments

Popular posts from this blog