।। गम्मत ।।
मी घेतला पावा,
लावले हो सूर,
कसला त्यातून,
आवाज आला बेसूर... 😊
बाजूच्या आजी,
मग ओरडल्या जोरात,
ऐकून ओरडा तिचा,
पळालो मी घरात।।
गंमत करावी म्हणून
पुन्हा पुन्हा वाजवला,
कोण जाणे कसा,
पण सूर गवसला।।
प्रयत्न माझा,
यशस्वी झाला,
बेसूर पावा,
मधुर झाला।।
प्रयत्न माझा, यशस्वी झाला।।
- प्रशांत
।। मैफील ।। तू आणि मी, भेटलो पाहिजे, कातरवेळी मैफिल सजली पाहीजे।। साथ तुझी मग, असतो मी डौलात एक तूच माझी लाख मोलांत।। तुझा स्पर्श व्हावा ओठांना म्हणूनच जगावे, आठ दहा रीत्या झाल्या, की डोलत उठावे।। सोबत तू असते म्हणून मी पणाचे अस्तित्व, पण घरी तर, कारभारणीच प्रभुत्व।। मग पुन्हा एकदा, ति...चा मी होतो, आणि सकाळी पुन्हा, संध्याकाळची वाट पाहतो।। - प्रशांत
Comments
Post a Comment