।। मैफील ।।

तू आणि मी,
भेटलो पाहिजे,
कातरवेळी मैफिल
सजली पाहीजे।।

साथ तुझी मग,
असतो मी डौलात
एक तूच माझी
लाख मोलांत।।

तुझा स्पर्श व्हावा ओठांना
म्हणूनच जगावे,
आठ दहा रीत्या झाल्या,
की डोलत उठावे।।

सोबत तू असते म्हणून
मी पणाचे अस्तित्व,
पण घरी तर,
कारभारणीच प्रभुत्व।।

मग पुन्हा एकदा,
ति...चा मी होतो,
आणि सकाळी पुन्हा,
संध्याकाळची वाट पाहतो।।

- प्रशांत

Comments

Popular posts from this blog