Posts

    ।। सावट ।। कातळ जमिनीत, या वर्षीही पेरले, बुजगावणे शेतात चहूकडे नेमले।। हिरवागार शालू धरणीने घातला, पाखरांच्या थव्यांनी आसमंत भरला।। पण... आकाशाने सावट पावसाचे घातले मातीतले पीक शेतातच विरले जबाबदारी ने तो पुन्हा एकदा वाकला, चालला, बसला, झुकला... आणि प्राणास मुकला।। - प्रशांत
  ।। कुरुक्षेत्र ।। पद प्रतिष्ठा राजभोग मिळविण्या, हट्ट कसा तो धृतराष्ट्राचा, दुर्योधन, शकुनी खेळी, खेळ हा षडयंत्रांचा।। शूर.. मित्र.. श्रेष्ठ धनुर्धारी, व्यक्तिमत्व तुझे दानशूराचे, मृत्युंजया श्राप होता तुला, पारडे का स्वीकारले अधर्माचे? धर्म रक्षण करण्या, होता अर्जुनाचा सारथी, पायधूळ त्याच्या मस्तकी, कृष्ण सख्या, तुझीच होती।। चहूकडे धूळ पायदळाची, चित्तथरारक होती... वीरांनी भूमी कुरुक्षेत्राची, केविलवाणी दणाणली होती।। तांडव मृत्यूचे, ज्वाला गगनभेदी, ढीग लागले शवांचे, कसे ओळखावे तव.. मुलाचे, बापाचे की अनाथांचे।। धर्मरक्षक तू, ज्ञानसागर तू, म्हणून... भवसागर तरण्यास, गीता सांगोनि दिले ज्ञान, संसार दुःख हरण्यास।। हा भवसागर तरण्यास।। - प्रशांत
 ।। मैफील ।। तू आणि मी, भेटलो पाहिजे, कातरवेळी मैफिल सजली पाहीजे।। साथ तुझी मग, असतो मी डौलात एक तूच माझी लाख मोलांत।। तुझा स्पर्श व्हावा ओठांना म्हणूनच जगावे, आठ दहा रीत्या झाल्या, की डोलत उठावे।। सोबत तू असते म्हणून मी पणाचे अस्तित्व, पण घरी तर, कारभारणीच प्रभुत्व।। मग पुन्हा एकदा, ति...चा मी होतो, आणि सकाळी पुन्हा, संध्याकाळची वाट पाहतो।। - प्रशांत
 ।। गम्मत ।। मी घेतला पावा, लावले हो सूर, कसला त्यातून, आवाज आला बेसूर... 😊 बाजूच्या आजी, मग ओरडल्या जोरात, ऐकून ओरडा तिचा, पळालो मी घरात।। गंमत करावी म्हणून पुन्हा पुन्हा वाजवला, कोण जाणे कसा, पण सूर गवसला।। प्रयत्न माझा, यशस्वी झाला, बेसूर पावा, मधुर झाला।। प्रयत्न माझा, यशस्वी झाला।। - प्रशांत